जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर राष्ट्रवादी च्या उमेदवारांनी बाजी मारली
रोहा वार्ताहर ( शैलेश गावंड)
रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर झाला असून विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
जिल्हा परिषद गट
१.३९ नागोठणे
सुमित दत्तात्रेय काते (शिवसेना शिंदे गट)
२. ४० आंबेवाडी
निधी नरेंद्र जाधव (राष्ट्रवादी)
३.४१ भुवनेश्वर
मधुकर मारुती पाटील (राष्ट्रवादी)
४. ४२. घोसाळे
उर्वशी उद्देश वाडकर (शिवसेना)
पंचायत समिती निकाल
१. ७७ नागोठणे*
समृद्धी संतोष कोळी (राष्ट्रवादी)
२. ७८ सुकेळी
अरुणा जानू हंबीर ( शिवसेना उबाठा)
३. ७९ कोलाड
जगन्नाथ गजानन धनावडे (राष्ट्रवादी)
४. ८० आंबेवाडी
संजय संभाजी मांडळूस्कर (राष्ट्रवादी)
५. ८१ धाटाव
विजया विनोद पाशिलकर (राष्ट्रवादी)
६. ८२ भुवनेश्वर
सुरेश धोंडू मगर (राष्ट्रवादी)
७. ८३ न्हावे
वर्षा हेमंत देशमुख (शिवसेना शिंदे गट)
८. ८४ घोसाळे
किसन गणपत मोरे(राष्ट्रवादी)
आंबेवाडी पंचायत समिती गणात संजय मंडलुस्कर राष्ट्रवादी अजित पवार गट यांना 5696 मते मिळाली व ते 1092 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. त्यांनी सुरेश शांताराम महाबळे शिवसेना शिंदे गट 4604 मते यांचा पराभव केला तसेच जिल्हा परिषद आंबेवाडी गणामध्ये निधी नरेंद्र जाधव राष्ट्रवादी अजित पवार गट यांना 12 497 मते मिळाली त्या 4507 मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या त्यांनी सीमा समीर महाबळे शिवसेना गट 8390 मते यांचा पराभव केला
कोलाड पंचायत समिती गणामध्ये जगन्नाथ धनावडे राष्ट्रवादी अजित पवार गट यांना 6083 मते मिळाली व ते 1295 मतांनी विजयी झाले त्यांनी शोभा मंगेश सरपळे शिवसेना शिंदे गट 4788 मध्ये यांना पराभूत केले
भुवनेश्वर मधून मधुकर मारुती पाटील व सुरेश मगर विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला
