



जे कुठेच घडले नाही, ते सुधागडात घडलेसंमिश्र कौलकुठे ‘सन्मान समिती’ची सरशी, तर कुठे ‘कमळ’ फुलले; तर कुठे मशाल पेटली तर कुठे घड्याळ चालले दत्तात्रय दळवी पाली, ता. 9 “जे कुठेच घडले नाही, ते सुधागडात घडले” या उक्तीचा प्रत्यय मतमोजणीतून आला आहे. सुधागडच्या राजकीय इतिहासातील अत्यंत वेगळ्या अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. ९) जाहीर झाला. ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार’ आणि ‘सुधागड सन्मान समिती’ची अभूतपूर्व युती यांमुळे गाजलेल्या या लढतीत मतदारांनी कोणा एका पक्षाची पाठराखण न करता उमेदवाराची ताकद आणि स्थानिक अस्मितेचा विचार करत संमिश्र कौल दिला आहे.सर्वात मोठी चुरस जांभूळपाडा जिल्हा परिषद गटात होती. येथे खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शरद बोडके यांनी स्थानिक अस्मितेचा मुद्दा लावून धरत नीलिमा पाटील यांचा २,९३१ मतांनी दणदणीत पराभव केला. शर्मिला बोडके यांना १०,०६० मते मिळाली, तर नीलिमा पाटील ७,१२९ मतांवर स्थिरावल्या. पक्षांतराचे राजकारण आणि बाहेरचा उमेदवार लादणे मतदारांना रुचले नसल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे.या निवडणुकीत सुधागडमध्ये ‘सुधागड सन्मान समिती’ने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. जरी भाजपने राबगाव गट आणि दोन गण राखले असले, तरी प्रतिष्ठेच्या जांभूळपाडा गटात झालेला पराभव खासदारांच्या नेतृत्वासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दुसरीकडे, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आपली ताकद दाखवून देत आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.चौकट 1राबगावमध्ये ‘कमळ’ टिकले, तर परळीत ‘मशाल’ धगधगलीराबगाव गट: जिल्हा परिषद गटात भाजपने आपले अस्तित्व राखले आहे. येथे भाजपचे चंद्रकांत कृष्णा वारगुडा यांनी शेकापच्या काशिनाथ हंबीर यांचा १,८७४ मतांनी पराभव करत विजय मिळवला. (वारगुडा: ९,८०७ मते, हंबीर: ७,९३३ मते).परळी गण: येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी विजयाचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी भाजपच्या सुनंदा सिंदकर यांचा २,५८८ मतांनी पराभव केला. प्रणिता परदेशींना ५,६८३ तर सुनंदा सिंदकर यांना ३,०९५ मते मिळाली. या निकालात राजेश परदेशी यांचा मोठा वाटा असून ते किंग मेकर ठरले. चौकट 2पंचायत समिती गणांचे चित्र: राष्ट्रवादीची एन्ट्रीअडुळसे गण: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदेश परशुराम शेवाळे यांनी शेकापच्या मिलिंद शेळके यांचा २,०१८ मतांनी पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संदेश शेवाळे यांना ५,६९० मते मिळाली.जांभूळपाडा गण: येथे भाजपने बाजी मारली आहे. जागृती राजेश मानकर यांनी शेकापच्या अतिश सागळे यांचा ८१३ मतांनी पराभव केला.राबगाव गण: भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांनी शेकापच्या मनिषा डोके यांचा ९४६ मतांनी पराभव करून विजय संपादन केला.फोटो ओळ, पाली, विजयानंतर गुलालाची उधळण करून जल्लोष करताना विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते
