

रोहा एसटी स्टँड येथे आधुनिक यंत्रणा सज्ज, नगराध्यक्ष कु वनश्री शेडगे यांच्या हस्ते आधुनिक उपकरणाचे लोकार्पण…
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रोहा एसटी स्थानकाचे स्वच्छतेकडे पहिले पाऊल, प्रवाशांना मिळणार स्वच्छता पूरक वातावरण. स्वच्छता हीच सेवा, स्वच्छता म्हणजे आरोग्य धनसंपदा… महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेल्या 78 वर्षांपासून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील दुर्गम शहरी वाडी वस्ती मधील नागरिकांना वाहन सेवा अविरतपणे देत आहेत. १ जून 1948 रोजी स्थापन झालेले या महामंडळ आणि विशेषता लाल परी हे नेहमी दुर्गम भागातील नागरिकांना जीवन वाहिनी ठरली आहे. गेले कित्येक वर्षापासून महामंडळ हे नागरिकांना सेवा पुरवत आहे परंतु अस्वच्छता आणि अपघात यामुळे महामंडळ नेहमीच चर्चेचे राहिले आहे. परंतु संपूर्ण रायगड जिल्हा सह रोहा बस स्थानक येते महामंडळाच्या मार्फत कंट्राती पद्धतीवर एक नवीन व्यवस्था उभी राहिली आहे, यामुळे महामंडळ आता स्वच्छतेच्या बाबतीत पाऊल पुढे टाकताना दिसत आहे. आज रोहा बस स्थानक येथे आधुनिक पद्धतीच्या सामग्री यंत्रणा तसेच स्वच्छतेच्या उपकरणाचे लोकार्पण संपन्न झाले. रोहा – अष्टमी नगरीचे माननीय नगराध्यक्ष कुमारी वनश्री अवनी समीर शेडगे यांच्या शुभहस्ते या उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर रोहा नगरीचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती अहमद दर्जी, रोहा नगरीचे सार्वजनिक बांधकाम व अपंग कल्याण सभापती राजेंद्र जैन, रोहा नगरीचे पाणीपुरवठा व दिवाबत्ती सभापती महेंद्र दिवेकर, शिक्षण क्रीडा व युवक कल्याण सभापती रवींद्र चाळके, पर्यटन पर्यावरण व नियोजन सभापती महेश कोलटकर, गटनेते महेंद्र गुजर रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे समाजसेवक प्रषित बारटक्के, केमिस्ट असोशियनचे अध्यक्ष स्वप्नील धनावडे यांच्या उपस्थितीत या आधुनिक साहित्याचे लोकार्पण करण्यात आले,त्याच बरोबर यावेळी जेष्ठ पत्रकार महादेव सरसंबे, पत्रकार दिनकर खरीवले, पत्रकार महेश मोहिते, पत्रकार अंजुम शेट्टे तसेच महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे कर्मचारी अधिकारी तसेच स्वच्छता कर्मचारी आदी रोहेकर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम हा रोहा आगार व्यवस्थापक श्री प्रकाश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
