
रोहा प्रतिनिधी…महेश मोहिते.
श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त रोहा येथे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा आमदार मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी श्री धावीर महाराजांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी, रोहा शहराच्या वतीने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार मा. श्री. भरतशेठ गोगावले यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा रोहा शहराध्यक्ष श्री. सुमित विलास रिसबूड, तालुका सरचिटणीस श्री. शैलेश रावकर, परेश चितळकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिल घरजाळे, श्री. सुदर्शन आंबले, विचारे काका* आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
