
🔥 रायगडमध्ये अवैध हातभट्टी दारूचे धंदे बंद करा! प्रशासनाला जाब विचारण्याची जनतेची वेळ
रायगड | विशेष बातमी
रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पारगान व फणसवाडी धनगरवाडी भालगाव उमरोली अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता ठोस आणि कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अवैध दारूच्या व्यवसायामुळे नागरिकांचे आरोग्य, तरुणांचे भविष्य आणि अनेक कुटुंबांचे संसार धोक्यात येतात
रायगड
जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्रीची ठिकाणे शोधून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त धडक मोहीम राबवून या व्यवसायावर प्रभावी नियंत्रण आणावे.
यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत या स्वस्त मिळणाऱ्या दारुमुळे अनेक नागरिकांनी जीव गमवला आहे
प्रश्न एकच — अवैध हातभट्टी दारूचे धंदे रोखण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस कारवाई करणार?
नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको. अवैध दारूविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून रायगड जिल्हा व्यसनमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, हीच जनतेची अपेक्षा!🙏🙏🙏
