

रोहा प्रतिनिधी.महेश मोहिते.
बोराणा परिवारातर्फे स्तुत्य उपक्रम शिक्षणासाठी थोडासा हातभार.
रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा, पिंगळसईच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मा. श्री. सुनील देशमुख यांच्या प्रयत्नातून कै. मानाशेठ बोराणा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बोराना परिवार, रोहा यांच्याकडून शाळेसाठी टेबल तसेच विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन आणि खाऊ यांचे उदार हस्ते वाटप करण्यात आले.
या मोलाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्राबद्दलची आपुलकी अत्यंत प्रेरणादायी आहे या कार्यक्रमात बोराणा संपूर्ण परिवार रोहा तसेच मा. श्री. सुनील देशमुख . शंकर शिंदे. किरण मोहिते.मुख्यध्यापिका सौ.धुमाळ मॅडम शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
