

*भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात परिवर्तनाचा कौल; जुने नेतृत्व नको, नवे चेहराच यंदा हवा! – अपक्ष उमेदवार पत्रकार कु दीप चंद्रकांत वायडेकर यांना तरुणांचा वाढता पाठिंबा.* प्रतिनिधी /समीर बामुगडे/भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात यावेळी केवळ निवडणूक नाही, तर जनतेचा एवढ्या वर्षाचा संताप आणि बदलाची ठाम इच्छा उघडपणे समोर येत आहे. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही गावांचा विकास न करणाऱ्या, तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जुन्या नेतृत्वाला आता भुवनेश्वरमधील मतदारांनी साफ नकार देण्याचा निर्णय घेतला आहे. गावोगावी एकच चर्चा सुरू आहे—आता जुने चेहरे नकोत, स्वच्छ, निर्भय आणि काम करणारे नवे तरुण नेतृत्वच हवे.भुवनेश्वर गटातील प्रत्येक गावात सध्या तरुणांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेसाठी अगोदर कित्येक वर्चस्व असणाऱ्या रा को प उमेदवार श्री मधुकर पाटील आहेत, शिवसेना शिंदे गटातून श्री सदेश मोरे, शिवसेना उभाठा मधून श्री नितीन वारंगे आणि विशेषतः अपक्ष कपबशी ह्या चिन्हावर चौथ्या क्रमांकावर पत्रकार कु दीप वायडेकर हे आहेत, या निवडणुकीत खरी रंगत राष्ट्रवादी अजित दादा गटाचे उमेदवार श्री मधुकर पाटील आणि अपक्ष उमेदवार पत्रकार कु दीप वायडेकर यांच्यात खरी लढत आहे.पत्रकार वायडेकर या तरुणांना गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बैठका, ग्रामसभा, चौकाचौकातील चर्चा आणि सोशल मीडियावर एकच सूर उमटतोय—या तरुणांनी किमान प्रश्न विचारण्याची हिंमत तरी दाखवली आहे. भ्रष्टाचार, सरकारी जमिनींची लूट, प्रशासनाशी असलेली संगनमताची साखळी यावर त्यांनी उघडपणे आवाज उठवला, हेच आज त्यांच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण ठरत आहे.याच्या उलट, जुन्या नेतृत्वाने मागील अनेक वर्षांत तरुण पिढीला केवळ आश्वासनांच्या पोकळ घोषणा दिल्या. पाच वर्षे भुलथाफा देण्यात गेली, आणि त्या काळात शेकडो तरुणांचं महत्त्वाचं वय निघून गेलं. रोजगार नाही, प्रशिक्षण नाही, दिशा नाही—फक्त राजकीय स्वार्थासाठी तरुणांचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा त्याच चेहऱ्यांना संधी देणं म्हणजे तरुण पिढीच्या भविष्यावरच पाणी फेरण्यासारखं आहे, अशी तीव्र भावना गावकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.आज भुवनेश्वरमध्ये वातावरण स्पष्ट आहे. हा लढा व्यक्तीविरोधात नाही, तर अपयशी आणि कंटाळवाण्या व्यवस्थेविरोधात आहे. भीती न बाळगता थेट प्रश्न विचारणारे, गावागावातील प्रश्न समजून घेणारे आणि सत्ता ही सेवा समजणारे तरुण पुढे येत आहेत. शेतकरी, महिला, युवक आणि सामान्य नागरिक उघडपणे या नव्या चेहऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात आता जुने नेतृत्व चालणार नाही, आणि नवीन, लढाऊ तरुण नेतृत्वालाच जनता थेट आणि निर्णायक कौल देणार, हे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
