
आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील’समाजरत्न पुरस्काराने, सन्मानित ————————बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)समाजाचे आपण काही देणे लागतो,या उक्तीप्रमाणे आपण काही सामाजिक कार्य करावे आणि समाजात सामाजिक दृष्ट्या जनजागृती करावी म्हणून गेली कीत्येक वर्षे कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या आशा स्वयंसेविका संजीवनी धोंडीराम पाटील या कार्यरत आहेत.आरोग्य विभागात सर्वोत्कृष्ट काम करत असताना त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.संजीवनी पाटील यांच्या सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल मुंबई येथील आम्ही वडाळा पूर्वकर या संस्थेने घेतली.त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून वडाळा येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संजीवनी पाटील यांना’समाजरत्न पुरस्काराने, सन्मानित करण्यात आले.त्यांना या प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
