
*भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात तरुणांचा उद्रेक; राष्ट्रवादी नेतृत्वाला जनता कंटाळली, नव्या चेहऱ्यांना थेट कौल* प्रतिनिधी :समीर बामुगडे भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात यावेळी केवळ निवडणूक नाही तर जनतेचा संताप आणि बदलाची लाट स्पष्टपणे दिसत आहे. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांच्या भ्रष्टाचार, सरकारी जमिनींची बळकावणी, आणि प्रशासनाशी संगनमतामुळे मतदार पूर्णतः वैतागले असून आता “जुने नकोत, स्वच्छ तरुण हवेत” असा ठाम सूर भुवनेश्वरमध्ये उमटत आहे.वरसे ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय पड जमीन, बिनआकारी जमीन आणि गुरुचरण सरकारी जागा बळकावण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर जनतेचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि धनदांडग्यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकारी जमीन लाटल्याचे आरोप केवळ चर्चेत नसून शासकीय अभिलेखांवर आधारित आहेत. माहिती अधिकारातून विजय चव्हाण यांनी मिळवलेल्या कागदपत्रांमुळे हा घोटाळा उघडा पडला असून महसूल प्रशासनाने खोटी माहिती देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जनतेत प्रचंड संताप निर्माण करणारा ठरला आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने अशाच वादग्रस्त नेत्याला उमेदवारी देणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. त्यामुळे भुवनेश्वरमधील मतदार आता उघडपणे राष्ट्रवादी नेतृत्वाला “बस झालं” असा इशारा देताना दिसत आहेत.याचवेळी भुवनेश्वर गटात तरुण नेतृत्व झपाट्याने पुढे येत आहे. सदेश मोरे, सचिन मोरे, संतोष खेरेटकर आणि विशेषतः दीप वायडेकर या तरुणांकडे जनतेचा ओघ वाढत आहे. दीप वायडेकर या सुशिक्षित तरुणाने अत्यंत कमी वयात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत थेट प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या गैरप्रकारांवर तोडगा काढण्यासाठी त्याची लढाऊ भूमिका लोकांना भावत आहे.“भय नाही, भ्रष्टाचार नाही” हीच भूमिका या तरुणांची ओळख बनली असून भुवनेश्वरमधील तरुण, शेतकरी, सामान्य नागरिक उघडपणे त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. गावागावात चर्चेचा विषय एकच आहे — यावेळी संधी तरुणांनाच!एकूणच, भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या जुन्या, कंटाळवाण्या आणि वादग्रस्त नेतृत्वाला घरचा रस्ता दाखवण्याची मानसिकता तयार झाली असून परिवर्तनाच्या या लढाईत तरुण उमेदवारांना जनतेचा स्पष्ट आणि निर्णायक कौल मिळणार, असे चित्र ठामपणे समोर येत आहे.
