
प्रात कार्यालयावर 27 फेब्रुवारीला बालगंगा प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत उपोषण…
पेण : मितेश जाधव
बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कोरा झालेला जमिनीचा सात बारा परत मिळावा” या मागणीसाठी शुक्रवार दि 27 रोजी सकाळी 11.00 वा. उपविभागीय कार्यालय येथे बालगंगा प्रकल्प ग्रस्त बेमुदत उपोषण करून बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह करणार असल्याचे निवेदन नुकतेच प्रात अधिकारी प्रवीण पवार यांना दिले आहे.
पेण तालुक्यात गेली 17 वर्ष बालगंगा प्रकल्प प्रलंबित आहे गेली 2010 पासून बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम सुरु झाले . या प्रकल्पामध्ये वाशिवली, वरसई, करोटी, गागोदे खुर्द, जावली, निधवली या सहा ग्रामपंचायतीसह 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्या, सुमारे 3800 हून अधिक कुटुंब बाधित झालेली आहेत. यामध्ये 1240 हेक्टर जमीन संपादित केलेली आहे.
जुना भूमी संपादन कायदा बदलून ‘न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन, पुनर्वसन, पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013’ अस्तित्वात आला आहे. या कायद्यातील कलम 101 नुसार संपादन केलेली जमीन पाच वर्षाच्या कालावधीत न वापरल्यास ती जमीन मुळ मालकाला किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याची तरतूद आहे. बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमिन संपादित करून 16 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे संपादित केलेल्या जमिनीचा सातबारा आपोआप कोरा झालेला आहे. तो कोरा झालेला सातबारा शेतकऱ्याला तो पुन्हा परत मिळावा या मागणीसाठी प्रकल्प ग्रस्त शेतकरी प्रात कार्यालयात समोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव , वासुदेव पाटील, अविनाश मोरे, प्रदीप गुरव, नितेश धारवे आदी प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
