








उरणमध्ये गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी; सामाजिक बांधिलकीसाठी बाळासाहेब अवसरे नेतृत्वाखाली कार्यक्रमउरण
(विशेष वृत्त) गुरु रविदास सामाजिक विकास संस्था, उरण यांच्यावतीने संत रोहिदास जयंती उत्साहात आणि सन्मानासह आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे ठिकाण राघोबा मंदिर, कोर्टनाका, उरण हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात कोकण चर्मकार समाजाच्या अध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर यांनी दीप प्रज्वलन करून व संत रोहिहास , छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली
या वेळी संत रोहिदास यांच्या जीवनाचे मूल्य आणि समाजसेवेतील योगदान यावर भाषणे झाली. सौ. दीपिकाताई चिपळूणकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,आज आपण सर्वजण महान संत समाज सुधारक आणि मानवतेचे उपासक संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत हा दिवस केवळ जन्मोत्सव नाही तर त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे संत रविदास महाराजांचा जन्म समाजातील वंचित घटकात झाला परंतु त्यांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही त्यांनी आपल्या कर्माने भक्ती आणि प्रामाणिकपणे त्याच्या जोरावर संपूर्ण समाजाला समानतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे मन चांगले असेल तर सर्व काही चांगलेच घडते म्हणजेच मन चंगा तो कठौती मे गंगा हे त्यांचे दोहे होते त्याने सांगितलं की ईश्वर हा मंदिरात किंवा मूर्तीत नाही तर प्रत्येकाच्या अंतकरणात आहे म्हणूनच त्यांनी जातीपातीला प्रखरपणे विरोध केला त्यांच्या जीवनात आपल्या समानतेने खरी भक्ती आणि अंतकरणातून मनातून असली पाहिजे असे संत रोहिदास महाराज होते त्यांना साजेशी आपण रोहिदास महाराजांची जयंती साजरी केली
संघटनेतील एकोपा महत्वाचा घटक आहे संघटनाही दोन दोन नसून एकच असावी म्हणून एकजूट आणि समानतेने समाजाची प्रगती होते. युवकांनी व महिलांनी सुद्धा संघटित झाले पाहिजे तरच आपल्या कार्य पुढे चांगले होईल . माननीय रवी भोईर उरण नगरपालिका उपनगराध्यक्ष यांनी आमच्या समाजासाठी एक समाज भवन द्यावे ही विनंती सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणात आमदार महेश बालदी यांना रवी भोईर यांच्यामार्फत मेसेज देऊन केली.
संत रोहिदास महाराज हे समाजसुधारक होते आणि मानवजातीचे खरे उपसाक होते; त्यांनी समाजातील अन्याय, भेदभाव आणि भ्रष्टाचार विरोधात लढा दिला.
त्या नंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत संतगीत, नाट्य सादरीकरण आणि समाजसेवेचे उपक्रम मांडले गेले. उपस्थितांनी उत्साहाने स्वागत केले आणि कार्यक्रमाचे कौतुक केले.
गुरु रविदास सामाजिक विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे स्थानिक समाजात एकजूट आणि सामाजिक समरसतेचा संदेश पोहोचला. सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभागी होऊन युवकांना समाजसेवा, नैतिक मूल्ये आणि प्रेरणा मिळवली. उपक्रमामुळे स्थानिक समाजात सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संस्था व नेतृत्वाचे कौतुक केले आणि भविष्यात असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उरण उपनगराध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक सत्यजित ठाकूर, डॉक्टर सत्या ठाकरे, कोकण चर्मकारी समाजाचे अध्यक्षा सौ. दीपिकाताई चिपळूणकर, नगरसेवक राजेश ठाकूर, आणि भाजप युवा सेनेचे निलेश पाटील व दिप दर्पण चे पत्रकार समीर बानुगडे उपस्थित होते. तसेच महिला सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब अवसरे (अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते ते म्हणजे दशरथ चव्हाण (कार्याध्यक्ष), गणेश जळगावकर (उपाध्यक्ष), जितेंद्र केळकर (सचिव), अर्जुन साबळे (सहसचिव), नरेंद्र काकडे (खजिनदार) आणि सागर नाचवणकर(सहखजिनदार).कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर केळकर तर सूत्रसंचालन दशरथ चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन जितेंद्र केळकर यांनी केले आशा प्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
