
रणसिंग महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह भैय्या रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी पदयात्रा काढली विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवकाळातील शौर्य , राष्ट्रप्रेम, स्वराज्य याविषयी जनजागृती केली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे सर, उपप्राचार्य डॉ प्रशांत शिंदे,प्रा. ज्ञानेश्वर गुळिग , व्याख्याते प्रा रवी गायकवाड उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रा रवी गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याचा आढावा घेताना आरमार बांधणी, अनेक मोहिमा , व्यापार , गुप्तहेर खात्याचे महत्व विशद करून शिवाजी महाराजांच्या पोलादी लष्करी प्रशासनाची उकल करुन स्वराज्याचे सुराज्यात कसे रुपांतर केले हे स्पष्ट केले.उपप्राचार्य डॉ प्रशांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे निश्र्चयाचा महामेरू त्यांचे कार्य आजही दिपस्तंभा सारखे प्रेरक आहे त्यांच्या त्याग , शौर्य, पराक्रमाची आठवण तेवत ठेवली पाहिजे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा ध्यास घराघरात घेतला पाहिजे तरच नैतिक समाज निर्माण होईल असे अवाहन केले. यावेळी महाविद्यालयातील विज्ञान शाखाप्रमुख डॉ सुहास बहिरट, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ डॉ विलास बुवा, आणि सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे समिती सदस्य प्रा डॉ अमर वाघमोडे प्रा.महादेव माळवे,प्रा सोमनाथ चव्हाण,प्रा आकांक्षा मेटकरी,प्रा.नितीन रुपनवर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा राजेंद्रकुमार डांगे यांनी केले सूत्रसंचालन प्रा सुवर्णा बनसोडे यांनी केले.आभार डॉ प्रशांत शिंदे यांनी मानले.
