

रोहा औद्योगिक क्षेत्रातील धाटाव येथील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर; अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार
कारखान्यांसमोरील अनधिकृतपणे उभी असलेली वाहने कंपनीच्या आवारात लावण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तर्फे मागणी.
रोहा प्रतिनिधी…. महेश मोहिते.
रोहा औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र वाहनतळ उपलब्ध नसल्याच्या प्रश्नावर औद्योगिक विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा सचिव अमोल पेणकर, रोहे तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे यांच सह सर्व सहकार्यामार्फत जाब विचारण्यात आला. यापूर्वी अनेक निवेदने देऊनही वाहनतळाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून देत, लवकरात लवकर वाहनतळाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हा सचिव अमोल पेणकर, रोहा तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, प्रताप खंडारे, नितीन मोंडे, अक्षय सावंत, रुपेश कराळे, साहिल म्हसकर, रोहित चव्हाण या सर्वांनी अधिकाऱ्यांना कारखान्यांसमोरील परिसरात अनधिकृतपणे उभी असलेली वाहने प्रत्यक्ष दाखविण्यात आली.व ती वाहने तेथून कंपनीच्या आवारात लावण्यास भाग पडले, ही वाहने संबंधित कंपनीच्या आवारात उभी करण्याची व्यवस्था करावी आणि कारखान्यांसमोरील रस्ते व परिसर मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली. “वाहनतळासाठी अनेकदा निवेदने दिल्यानंतरही ठोस कार्यवाही का झालेली नाही? वाहनतळासाठी जागा कधी निश्चित होणार? कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत वाहने उभी करण्यासाठी पर्याय काय?” अशा प्रश्नांचा भडिमार करून अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तरांची मागणी करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील वाहनांच्या उभे राहण्याचे नियोजन करण्यासाठी औद्योगिक विभाग आणि संबंधित कारखान्यांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. वाहनतळाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, तसेच तोपर्यंत संबंधित कंपन्यांनी आपल्या आवारात वाहनांची व्यवस्था करावी, या मागणीवर भर देण्यात आला.
