


तनया गावंड हिची नेमबाजी साठी राष्ट्रीय स्पर्धे मध्ये निवड मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार
विशेष वृत्त(शैलेश गावंड)
ठाणे येथे सेवा बजावत असलेले हाशिवरे गावचे रहिवासी ए पी आय संदेश गावंड यांची सुकन्या कु. तनया गावंड हिची नेमबाजी स्पर्धे साठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे
मागील महिन्यात मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन एअर पिस्टल नेमबाजी स्पर्धेत ठाणे विभागातून सुवर्णपदक पटकावणाऱ्या कु. तनया गावंड हिने आपल्या यशाची परंपरा कायम राखत पुढील स्पर्धेतही दैदीप्यमान कामगिरी केली आहे.
मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरविभागीय एअर पिस्टल नेमबाजी स्पर्धेत तनयाने वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक तसेच सांघिक प्रकारातही कांस्यपदक पटकावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
विशेष म्हणजे, या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कु. तनया गावंड हिची आता ऑल इंडिया आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता निवड झाली आहे. ती देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत लवकरच सहभागी होणार आहे.
तिची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि खेळाप्रती असलेले समर्पण यांचे हे फलित आहे. तनयाच्या या यशामुळे तिचे आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संपूर्ण रायगड करांची मान अभिमानाने उंचावली आहे.
आणि सर्वत्र तिचे कौतुक होत आहे तसेच
डेहराडून येथे होणाऱ्या आगामी ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तनयाला सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत
राष्ट्रीय स्तरावरही तनया आपल्या अचूक नेमबाजीने यशाचे नवे शिखर गाठेल आणि मुंबई विद्यापीठासह अलिबाग तालुका व रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल अशी सर्वांना खात्री आहे
