




राष्ट्रीय राज मार्ग क्र.348 पागजं- चौक जंक्शन महामार्गाच्या भू संपादन प्रक्रियेस बाधित शेतकऱ्याचा विरोध …….
विरोध दर्शविण्या साठी बाधित शेतकऱ्यांनी मा.उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या कडे दिले निवेदन….
पागोटे – चौक ग्रीन फिल्ड जंक्शन महामार्ग संघर्ष समेती मार्फत् बाधित शेतकऱ्यांनी मा. उपविभागीय अधिकारी, पनवेल याच्या कडे विरोध दर्शवण्या साठी दिले निवेदन…
पनवेल सुरेश् तांडेल दि. 30 सप्टेंबर
रायगड मधील पनवेल उरण आणी खालापूर येथील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी पनवेल येथील् मा. उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयात जाऊन मा.उपविभागीय अधिकारी श्री पवन चांडक यांच्या सोबत महत्वाची बैठक घेतली , या बैठकीत शेताकऱ्यांनी विविध प्रकारचे प्रश्न उपस्तित केले . त्या नंतर सर्व शेतकऱ्याच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदन देण्यात आले .
प्रस्तावित राष्ट्रीय राज मार्ग क्रमांक 348 पागोटे – चौक जंक्शन ग्रीन फिल्ड महामार्ग बाधित शेताकऱ्यांनी सदरहून महामार्गाच्या भू संपादनासाठी पुढील कारना साठी विरोध दर्शवला आहे.
1) सदर महामार्गाच्या सूचना आम्हाला प्राप्त न झाल्या मुळे आम्ही सदर हून महामार्गाच्या प्रक्रियेला लेखी हरकत दाखल करू शकलो नाही . तरी या निवेदनात आम्हि आपल्या कडे लेखी हक्क दाखल करण्याचा हक्क आबाधित ठेवतो.
2 )आपली लोकशाही शासन व्यवस्था आहे.त्या मुळे सदरहून महामार्गाचे नियोजन करण्या पूर्वी आम्ही बाधित शेतकरी ,स्थानिक स्वराज संस्था , ग्राम पंचायत , यांना विश्वासात घेणे महत्वाचे होते.
3 ) प्रस्तापित महामार्गा साठी संपदीत होणारी जमीन अत्यंत सुपीक आहे शिवाय सदराची जमीन् आमच्या उदर निर्वाचे साधन आहे .
4) सदरच्या प्रस्थापित् महामार्गा मुळे वृक्ष तोड ,जमीन उतखणन आदी कारणा मुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. त्या मुळे आमच्या जिवन् मानावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
5) शिवाय आमच्या विभागातील बाधित शेतकरी यांना जमिनीचा मोहबद्ला घेण्या बाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.सदरहून नोटीस मध्ये लावलेलं दर आत्याल्प आणि शेतकरी वर्गाचा आवमान करणारा आहे. आमचे क्षेत्र आटलं शेतू , विरार अलिबाग कॉरिडोर , J. N . P. T. , तिसरी मुंबई, नवी मुंबई विमानतळ , मुंबई गोवा महामार्ग , मुंबई पुणा एक्सप्रेस हे मार्ग लागत आसल्या
मुळे आमच्या जमिनीचे मूल्यणकण किती तरी पटीने अधिक आहे.
6)सदराच्या नोटीस मध्ये जमिनी साठी लावलेल्या दारात ताफावत् दिसून येते.जमीन संपदन् उदिष्ट एकच असल्या मुळे सर्व शेतकऱ्यांना एकच भाव मिळायला हवा . आपल्या या धोरणा मुळे शेतकरी वर्गात असंतोष आणि अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
7) आपल्या कार्यालया कदुन् आमच्या काही शेतकऱ्यांना मोबदला स्वीकरण्याच्या नोटीसा प्राप्त झाल्या आहेत परुंतु सदराचा मोबदला अन्याय कारक आहे .म्हणून सदरहून मोबदला आम्ही स्वीकार करू शकत नाही .व त्यास विरोध करत आहोत.याची कृपया नोंद घ्यावी .
वरील पार्श्वभूमीवर आम्ही सदरहून प्रस्तापित महामार्गाच्या भू संपादनास् विरोध करत आहोत.
हे निवेदन देताना बहू संख्येने शेतकरी उपस्तिती होते. यामध्ये समाजिक कार्य करते श्री . सुधाकर पाटील , ऍड . राजेंद्र मढवी, प्रतिष्टीत शेतकरी , श्री. प्रभाकर पाटील,श्री. जितेंद्र पाटील, श्री. दशरथ पाटील, श्री. दामोदर पाटील. नाशिकेत जोमा कोळी, बालाजी चांग्या कोळी ,रामदास हशा पाटील , विलास मधुकर, कोळी , राजेश चांग्या खोली ,लक्ष्मी हरिश्चंद्र चौगुले ,उमेश जमा कोळी, केशव नारायण कोळी , केशव पाटील ,नामूबाई हरिश्चंद्र कोळी,दामोदर बालाराम पाटील आणी परकार उपस्थित होते
