
रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार सामाजिक कार्यकर्ते श्री किरण मोहिते.
रोहा प्रतिनिधी…महेश मोहिते.
रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे विद्युत मंडळाच्या डीपी जवळील बॉक्सला झाकण नाही लाईन मनला तोंडी तक्रार करून ही परिस्थिती जशीच्या तशी आहे
रोहा शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पिगलसई गावातील कालवा रोड येथील डीपी जवळील बॉक्स कित्येक महिने झाकणविना उघडा आहे या डीपी जवळील बॉक्सच्या बाजूला शेतात क्रिकेटचे सामने वारंवार होत असतात व आजूबाजूला गवत वाढल्यामुळे तेथे गुरे व म्हशी चरण्यासाठी जात असतात म्हशीला एक वाईट सवय असते ती म्हणजे काही खरखरीत दिसल्यास आपले पाठ घासत जाण्याची कदाचित जर या डीपी जवळील बॉक्सला म्हशी किंवा गाई बैलाला विद्युत वाहिनीचा प्रचंड मोठा दाबाचा
झटका लागून जर जीवित हानी झाल्यास यास जबाबदार कोण असा सवाल पिंगळसई चे सामाजिक कार्यकर्ते श्री किरण मोहिते यांनी केला आहे रोहा तालुक्यातील कित्येक गावामध्ये डीपी जवळील बॉक्स उघडे पाहायला मिळतात एक बीजागिरीवर अवलंबून असलेल्या आशा निष्कृष्ट दर्जाच्या डीपी जवळील पॅनल बॉक्स चांगल्या प्रतीचे आणून लोकांना भयमुक्त करावे.
