


डी एम सी सी स्पेशालिटी केमिकल्सतर्फे आज भव्य रक्तदान शिबिर.
कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त सामाजिक उपक्रम मागीलवर्षी १०७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रोहे येथील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील डी एम सी सी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज, २४ सप्टेंबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा सामाजिक संदेश देत कंपनीने यंदाही रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाला प्राधान्य दिले आहे.
डी एम सी सी कंपनीकडून सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिरात कंपनीतील अधिकारी, कर्मचारी तसेच इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी २५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. या सामाजिक योगदानाची दखल घेत जिल्हा शासकीय रक्त केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग-रायगड यांच्याकडून डी एम सी सी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड, रोहा यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
यंदाही मागील वर्षाप्रमाणे अधिकाधिक रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदानाचा संकल्प करावा, यासाठी कंपनीच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. “आपल्या एका छोट्याशा कृतीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात” हा संदेश देत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
रक्ताची गरज कोणत्याही क्षणी, कोणालाही भासू शकते. त्यामुळे अशा शिबिरांच्या माध्यमातून रक्तसाठा वाढविण्यासोबतच समाजात रक्तदानाबाबत हे मतसकारात्मक जनजागृती निर्माण होत असल्याने डी एम सी सी चा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.यावेळी पोलिस निरीक्षक श्री अभय शेलार.युनिट हेड साळवी साहेब.एच आर मॅनेजर श्री अनिल जांभळे साहेब.श्री विष्णू लोखंडे.श्री निलेश शेडगे. श्री राकेश खांडेकर.व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
