


रोहा शिवसेना आयोजित दहीहंडी स्पर्धेत गोविंदा पथकांचा उस्फूर्त प्रतिसाद.
मागील वर्षी थोडक्यात हुकलेल्या दहीहंडीचा विजय खेचत. खारी गोविंदा पथक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. खारी गावची पोर लय हुशार चा जयघोष.
रोहा प्रतिनिधी…(महेश मोहिते )
रोहा तालुक्यात शिवसेना पक्षातर्फे दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना युवा नेते आकाश भैया धोत्रे. महेंद्र दळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष पाटील यांच्या नियोजनातून आयोजित भव्य दिव्य दहीहंडी स्पर्धेत रोहा तालुक्यातील असंख्य गोविंदा पथकाने हजेरी लावली होती. मागील वर्षी आठ थर लावण्यात अपयशी ठरलेल्या लोटनेश्वर खारी गोविंदा पथकाने मात्र यावर्षी आपण शिवसेनेची मानाची दहीहंडी फोडायचीच असा चंग बांधीत सराव करीत जिद्द व चिकाटी ठेवली होती. अखेर त्यांना यश आले व शिवसेनेच्या दहीहंडी स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
सदर दहीहंडी स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले,रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रमोदजी घोसालकर, जिल्हा परिषद सदस्य सुमित काते, जिल्हा परिषदेच्या उर्वशी उद्देश वाडकर, तालुकाप्रमुख उद्देश वाडकर, शिवसेना नेते अशोक शेठ धोत्रे, शिवसेना नेते संतोष पोटफोडे, सौ पूजा पोटफोडे. शिल्पाताई धोत्रे,सुरेशदादा महाबले, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत लोखंडे निलेश जी वारंगे, समीर महाबले, मंगेशशेठ सरफळे, उप तालुका प्रमुख मनोज दादा खांडेकर संतोषशेठ खेरटकर, लालताशेठ कुशवाह, उस्मानभाई रोहेकर,
शहर प्रमुख मंगेश रावकर रोहा तालुका युवा सेना प्रमुख रोशन पवार, शहराध्यक्ष युवा सेना राहुल गुरव, अमलकांत मोरे ,व समस्त शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रोहा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने मागील वर्षी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर या दुसऱ्या वर्षी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा भरवली गेली. अतिशय शिस्तबद्ध असे नियोजन करण्यात आले होते. भव्य दिव्य झालेली दहीहंडी स्पर्धा यामुळे शिवसेना पक्ष आता रोह्यात चांगलाच तग धरू लागल्याची दिसून आले. मंत्री व पालकमंत्री भरत शेठ गोगावले, दमदार आमदार महेंद्र दळवी यांचे रोहे तालुक्यावर जातीने लक्ष आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रोहे तालुक्यात अनेक मातब्बर नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे. शिवसेनेची दहीहंडी रोहे तालुक्यात अधिक लोकप्रियतेच्या शिखरावर जाणार असल्याचे बोलले जाते.
लाटणेश्वर खारी या गोविंदा पथकास आकाश भैया धोत्रे यांच्या हस्ते एक लाख 21 हजार रोख रक्कम स्मृतिचिन्ह व मानाची गदा असं पारितोषिक देण्यात आले.
