
रोह्यात राष्ट्रवादीला जोरदार राजकीय धक्का
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
माजी नगराध्यक्ष संतोष जी पोटफोडे शिंदेंच्या शिवसेनेत
रायगडच्या रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना राजकीय धक्का
रोहयाचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व शहराध्यक्ष अमित ऊकडे.शहर युवक अध्यक्ष सागर बोबडे . मयुर पायगुडे.यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला पालकमंत्री भरतशेट गोगावले व आमदार महेंद्र शेट दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. संतोष पोटफोडे यांचे तटकरे कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याने त्यांच्या पक्षबदलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी संतोष पोटफोडे म्हणाले आम्ही जुने पदाधिकारी आहोत मात्र पक्षात आम्हाला सातत्याने डावलले जात होते. स्थानिक नेतृत्व असुनही विविध कार्यक्रमांमध्ये आम्हाला योग्य स्थान दिले जात नव्हते म्हणून आम्ही हा निर्णय घेतल.
शिवसेनेत योग्य सन्मान मिळेल.
भरतशेट गोगावले……. स्थानिक पातळीवरील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसेनेत योग्य सन्मान व स्थान देण्याची भूमिका शिवसेनेत आहे.
