
रोहा तालुका शिवसेना तर्फे ४ सप्टेंबरला दहीहंडीचे आयोजन
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते.
रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी११ वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह समोरील पटांगणात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेतपुरुष पथकासाठी ७ थरांना २१ हजार रुपये तर ६ थरांना ११ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. महिला पथकासाठी ५ थरांना ७ हजार रुपये व ४ थरांना ५ हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले तसेच मुख्य दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी १ लाख ११ हजार रुपयाचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्या २५ गोविंदा पथकास प्रवेश देण्यात येणार असून अंतिम निर्णय आयोजकांचा राहील दहीहंडी स्पर्धेत मोठ्या संख्येने गोविंदा पथकाने हजर राहावे असे आवाहन रोहा शिवसेना वतीने करण्यात आले.
