
रोहा पोलिसांची धडक कारवाई
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
दि.23/08/26 रोजी रोहा पोलीस ठाणे हददीतील मौजे टिटवी गावहद्दीमधील जंगल भागात गावठी हातभटटीची दारू तयार दारुभट्टीवर छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणी 12 निळया रंगाच्या प्लास्टीकच्या ड्रममध्ये एकुण 2400 लीटर गावठी दारू तयार करण्याकरीता लागणारे रसायन, ॲल्युमिनियमचा गावठी दारू गाळण्याचा तपेला व झाकणी , गावठी हातभट्टी दारू 10 लिटर असा एकुण रूपये 1,57,000 किंमतीचा मुददेमाल मिळुन आला. सदरचा मुददेमाल व रसायन जंगलभागातुन वाहतुकीस अवजड असल्याने प्लास्टीकच्या ड्रम व रसायन व इतर साहित्य असा मुददेमाल जागीच नष्ट करण्यात आलेला आहे. सदर बाबतचे अज्ञात आरोपी पोलिसांचा सुगावा लागताच तेथून पसार झाले.त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई रोहा पोलीस निरीक्षक श्री अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.
