
रोहा तालुक्यातील धामणसई येथे दारू अवैध धंदे सुरू असल्याचे कळताच पोलिस प्रशासनाने घेतली दखल.
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रोहा पोलीस ठाणे हद्दीत
धामणसई गावचे हद्दीत इसम नाव उत्तम सुभाष शेवडे वय 55 वर्ष यांचे राहते घराचे मागील बाजूस हातभट्टी दारूची विक्री करीत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी रेड केली असता 100 लिटर गावठी दारू, किंमत अंदाजे 10,000 रुपये हस्तगत करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री अभय शेलार व सहकारी कर्मचारी करीत आहेत.
