

रोहा पोलिसांची दमदार कामगिरी
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रोहा पोलीस निरीक्षक श्री अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली
आज दि.22/08/26 रोजी रोहा पोलीस ठाणे हददीतील केळघर परिसरातील जंगल भागात गावठी हातभटटीची दारू तयार करीत असलेबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता 11 निळया रंगाच्या प्लास्टीकच्या ड्रममध्ये एकुण 2200 लीटर गावठी हातभटटीची दारू तयार करण्याकरीता लागणारे रसायन असा एकुण रूपये 1,15,500 किंमतीचा मुददेमाल मिळुन आला. सदरचा मुददेमाल व रसायन जंगलभागातुन वाहतुकीस अवजड असल्याने प्लास्टीकच्या ड्रम व रसायन असा मुददेमाल जागीच नष्ट करण्यात आलेला आहे. सदरबाबत आरोपीत 1) चंदा यशवंत झोरे वय 50 वर्षे, 2) ललिता काशिराम गोरे, वय 48 वर्षे, 3) रंजना बाबु गोरे, वय 51वर्षे, सर्व रा.बेलवाडी, ता.रोहा यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्याची संपुर्ण टिम ची कार्यवाही करण्यात मोलाची साथ लाभली.
