

रोहा बस स्थानकाच्या शौचालयाची जैसे थी अवस्था पाणीच नाही.
रोहा प्रतिनिधी…महेश मोहिते.
गेले कित्येक दिवस गाजत असलेल्या रोहा बसस्थानकेच्या स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा नाराजी दिसून आली .गेले किती दिवस स्वच्छ्ता गृहामध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांमध्ये चिड निर्माण झाली आहे गेले बरेच दिवस एसटी प्रशासनाला पाण्याचा पंप बिघडला आहे त्याची दुरुस्ती करावी असे प्रशासनाला सांगुन सुद्धा रोहा एसटी प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे दिसून येते.
पाण्याचा पंप लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
