

पिंगळसई गॄप ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले!*
*आरक्षण सोडतीसाठी १२ जून रोजी विशेष ग्रामसभा संपन्न.
रोहा: महेश मोहिते. रोहा (रायगड) :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आदेशानुसार रोहा तालुक्यातील पिंगळसई गॄप ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत दिनांक १२ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभेद्वारे संपन्न झाली .राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्विक निवडणुकांसाठी हे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून पिंगळसई ग्रामपंचायतीचाही यात समावेश आहे. रोहा तहसील कार्यालय च्या आदेशानुसार मंडळ अधिकारी श्री बीटी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली श्री कृष्णा लांगी ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत ठीक ठीक 2/30 मिनिटांनी आरक्षण सोडतील सुरुवात झाली. या विशेष सभेत प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आले अनुसूचीत जाती जमाती इतर मागासवर्गीय महिला व सर्वसाधारणजमाती इतर मागासवर्गीय महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले तहसीलदार डॉ .किशोर देशमुख संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला ग्रामपंचायतीतील श्री संतोष खेरटकर बबन मोहिते शिवाजी मुटके तुषार देशमुख प्रसाद देशमुख शंकर शिंदे रोशनी देशमुख सुनील पवार संतोष जाधव संतोष मोहिते नरेश देशमुख चंद्रकांत दहिम्बेकर व ग्रामस्थ हजर होते.
