
** आशा शिर्के यांची रोहा तालुका महीला जनसंपर्क प्रमुखपदी निवड *
*दिल्ली येथील पोलीस मित्र संघटनेने दिले नियुक्ती पत्र
रोहा प्रतिनिधी..: महेश मोहिते.
येथील राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस आशा रंजन शिर्के यांची नवी दिल्ली येथील पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांची सूचना व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल पाटील व महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष सुजाताई चिंता यांच्या सहमतीने तसेच जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद वाजंत्री,महिला जिल्हा अध्यक्षा सुनंदा मोहिते, महीला तालुका अध्यक्षा मानसी क्षीरसागर यांच्या सहकार्याने रोहा तालुका महिला जनसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. संघटनेने 29 मे रोजी दिलेल्या पत्रात आशा रंजन शिर्के यांची रोहा तालुका जनसंपर्क प्रमुख महिला जिल्हा रायगड पदी निवड करण्यात आली आहे. आपण आपल्या संघटनेचे महत्व ओळखून पोलीस व नागरीकांना मदत कराल आणि संघटनेची प्रतीमा जनसमुदाय मध्ये उज्वल करून संघटनेचा जनाधार मजबूत होईल. अशा प्रकारचे कार्य कराल असा विश्वास व्यक्त केला आहे. आशा शिर्के यांची निवड होताच नागोठणे शहर व विभाग तसेच रोहा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
