
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नंदीनी गौशाळेला हिरव्या चाऱ्याची देणगी
[ युवा उद्योजक शहाजी ठोंबरे व मिञ परिवाराचा स्तुत्य उपक्रम ]
दौंड प्रतिनिधी –
गेल्या चार महिन्यांपासून नाथाचीवाडी आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जून महिना सुरू झाला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन नाथाचीवाडी येथील युवा उद्योजक शहाजी ठोंबरे व त्यांच्या मिञ परिवाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाथाचीवाडी येथे श्रीराम सुदाम इनामके यांनी उभारलेल्या श्रीकृष्ण नंदीनी गौशाळेतील जनावरांना पुरेसा हिरव्या चाऱ्याची देणगी दिली. त्यामुळे गौशाळेतील गाईंना दिलासा मिळाला आहे. सध्या तीव्र उन्हाळ्यात चारा टंचाई भासत असताना युवा उद्योजक शहाजी ठोंबरे व मिञ परिवाराने दिलेली चाऱ्याची देणगी गौशाळेसाठी महत्वाची ठरल्याचे श्रीराम इनामके यांनी सांगितले. यावेळी गजानन वळकुंडे, समीर ठोंबरे, सागर होले, तुकाराम ठोंबरे, सुनील वळकुंडे, चिंटू चोरमले, राहुल थोरात, राहुल इनामके, कृष्णा चोरमले, सिध्देश्वर वळकुंडे, नितीन ठोंबरे, विकास झाडगे, हर्षल ठोंबरे, सुरज ठोंबरे, अनिकेत वळकुंडे, प्रदिप थोरात, अथर्व हाके यांसह शहाजी ठोंबरे मिञ परिवार उपस्थित होते. यावेळी गौशाळेचे संस्थापक श्रीराम इनामके यांच्याकडून शहाजी ठोंबरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहाजी ठोंबरे व मिञ परिवाराने गौ मातेची सेवा करुन आशीर्वाद घेतले.
