
मैत्री चषक २०२६ रायगड दिव्यांग संघ विजेता तर नवी मुबंई उपविजेता
कुलाबा दिव्यांग सोशल फौंडेशन इंडिया व कुलाबा दिव्यांग क्रिकेट असोसिएशन आयोजित मैत्री चषक २०२६ मुंबई रायगड नवी मुंबई ठाणे या चार संघामध्ये २१ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे उदघाटन संदीप मुंढे मा. सरपंच वासाबे रोटरी क्लब ऑफ इंडिया अध्यक्ष राकेश वर्तक स्पोर्ट्स डायरेक्टर सुनील भोसले डायरेक्टर नागेश कदम यांनी एनआय एस एम ग्राउंड मोहपाडा येथे केले या स्पर्धेत रायगड संघ विजेता तर नवी मुंबई उपविजेता ठरले रायगड संघाने नाणेफेक जिकूंन प्रथम गोलंदाजी करत नवी मुंबई संघाने १० षटकात 7 विकेट 56 धावा केल्यातर रायगड संघाने 9 विकेटने विजय प्राप्त केला या स्पर्धेत रायगड संघाचे प्रसाद मन ऑफ द सिरीज ऋषिकेश एसपाटील बेस्ट बॅटमॅन कल्पेश ठाकूर बेस्ट बॉलर व नवी मुंबई संघाचे महेश वसावे बेस्ट फिल्डर चे मानकरी ठरले या स्पर्धेचे आयोजन कुलाबा दिव्यांग फौंडेशन इंडिया चे अध्यक्ष शशांक हिरवे कार्याध्यक्ष तथा सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील सचिव सुनील पाटील खजिनदार अरुण घोडके स्वामीज्ञ फौंडेशनचे अध्यक्ष अंजली घोडके कल्पेश तवले मंगेश पारटे नागनाथ घोडके रुपेश पवार चंद्रकांत पवार रवी भोईर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांज ज्वेलर्स वाशी नवी मुंबई योगेश खाने साईराज ट्रान्सपोर्ट प्रफुल विचारे वावर्ले नंदकुमार मोरे चौक स्वर्गीय संतोष खंडागळे स्मृती ठाणे तानाजी खंडागळे उद्योजक अभिजित देशमूख जगदीश हातामोडे उपसरपंच चौक सदस्य निखिल मालुसरे उषा मुंढे सरपंच वासाबे राज नंदबार यांचे सहकार्य लाभले
