
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत नांदगाव – मजगांव मध्ये अजित कासार व अस्लम हलडे यांची प्रचारात आघाडी मजगांव,ता.४(बाबुराव गोळे) आगामी होणा-या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत नांदगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस -कॉंग्रेस-शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)-शे.का.पक्ष व मित्र पक्षाचे जिल्हा परिषद राजपुरी गटातील उमेदवार अजित कासार व पंचायत समिती निवडणूक उमेदवार अस्लम हलडे यांच्या प्रचाराचा मतदार संघात झंझावात असून ठिकठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व शेकाप आघाडी मित्र पक्षाचे ३८ राजपुरी गटाचे उमेदवार अजित कासार व ७५ पंचायत समिती गणाचे उमेदवार अस्लम हलडे यांच्या प्रचारार्थ नांदगाव तसेच मजगांव येथील प्रचारफेरी कुंभारवाडा, भंडारआळी, नवीआळी(कोळीवाडा), खार मजगांव या ठिकाणी घरोघरी जाऊन काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मनोज भगत, मुरुड नगराध्यक्षा आराधना दांडेकर, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर,आशिका ठाकूर,हसमुख जैन,अंकुश चाचे प्रिता चौलकर,प्रमिला माळी,भाई सुर्वे, संजय गुंजाळ, प्रांजली मकू,स्मिता खेडेकर, रविंद्र खेडेकर, कॉग्रेस पक्षाचे नेते ॲड.इस्माईल घोले,जिल्हा परिषद माजी सदस्य नम्रता कासार, सरपंच सेजल घुमकर, सुदेश घुमकर,सचिन पाटील, नरेश कुबल,हमिद कडू,मुस्तकिन साठे, महंमद चिपळूणकर, नितेश रावजी,सलिम हलडे,मुब्बशिर लालसे,प्रतिक दळवी,बाळू मालवणकर, गणेश गाणार,उदय थळे, विक्रांत कुबल, योगेश पाटील,हसन उलडे,ताबिज उलडे,मुजिब कासकर, निसार तालिब,पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.
