


पेण वनविभागाच्या हद्दीत वारंवार वनव्यांचे सत्र सुरूच, एका महिन्यात चार वेळा वनवे लागण्याच्या घटना.प्रतिनिधी:समीर बामुगडे पेण वन विभागाच्या हद्दीत वारंवार वनव्यांचे सत्र सुरू असल्याने हजारो एकर वन जमिनीवरील जंगल जळून खाक झाल्याने वन्यजीवनी जायचे कुठे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला आहे. दरम्यान पेण परिसरात दगडखानी आणि अवैध्य माती उत्खनन जोरात होत असताना याच परिसरात वारंवार वनवे लागणे ही बाब वन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले आहे. ह्या परिसरात लागणाऱ्या वनव्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पेण परिक्षेत्राधिकाऱ्यांसह महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन सचिव आणि मुख्य वन संरक्षकांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याचे सांगून पेण वनपरिक्षेत्र अधिकारी ह्या पेण तालुक्यातील ठेकेदार, दगड खाण, आणि माती चोरांसाठी काम करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान पेण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्य कक्षेत येणाऱ्या डोंगरांना वारंवार वनवे लागण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. मागील एका महिन्यात चार वेळा वनवे लागण्याचे प्रकार घडले आहे. मागच्याच आठवड्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी वनवे लागले होते त्यावेळेस स्वतः संतोष ठाकूर यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळविले होते यावेळी त्यांनी वनवा लावणाऱ्यांचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु त्यानंतर हे कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून त्यांनी वनसचिव आणि मुख्य वनसंरक्षक यांना देखील आपले सरकार कोर्टाच्या माध्यमातून तक्रार दाखल केली परंतु त्याबाबतही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आपण काहीही केले तरी आपल्याला कोणीही विचारणारे नसल्याच्या अविर्भावात असलेल्या वन परिक्षेत्राधिकार्यांच्या हद्दीतील हमरापुर परिसरात आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वनवा लागून शेकडो एकर जमिनीवरील जंगल आणि वन्यजीवांचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे दगड आणि माती माफियांसाठी पेन वनपरिक्षेत्र अधिकारी काम करतात का? असं संवाल विचारला जात आहे.
