


प्रदुषण मंडळाचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात? रोहा:समीर बामुगडे रोहा:धाटाव औधौगिक वसाहातीत रासायनिक कंपनीमधून होणा-या वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण जिवन धोक्यात आले आहे शासन व प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हे प्रदुषण म्हणजे कायमचीच डोकेदुखी बनली आहे वायुप्रदुषण तर आहेच परंतू या कंपनीमधून सोडण्यात येणा-या पाण्यातने जल आणि जमिन याचेही मोठया प्रमाणात नुकसान होत आहे,दमा खोकला यासारखे आजार वाढून येथील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत आहे मोॅनिग वोॅकला जाणा-या नागरिकांना शुध्द हवे ऐवजी वायुमिश्वित हवेची भेट या कंपन्यांकडून मिळत आहे जसे चोर अंधाराचा फायदा घेतात त्याप्रमाणेच कंपन्यानी धुक्याचा फायदा घेऊन वायुप्रदुषणात वाढ केली आहे,याचा त्रास लहान बालके व वृध्द मंडळी यांना फार होत आहे याप्रदुषणामुळे नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे मुश्किल झाले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिकानी वारंवार तक्रारी करुन प्रदुषण मंडळ काहीच कारवाई करित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळेच त्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वरिष्ठानी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावीच अन्यथा जर का येथे मोठा अनर्थ घडला तर त्याला प्रदुषण मंडळच जबाबदार असेल असे नागरिकाचे म्हणणे आहे,
