
युनिव्हर्सल कॉन्व्हेंट,स्कूल, ट्यूशनचे”हळदी कुमकुम सोहळा”संजीव भांबोरेनागपूर –चांदमारी नगर, पवनशक्ती नगर वाठोडा नागपूर येथे 1/2/2026 रोजी युनिव्हर्सल, स्कूल, ट्यूशन येथे हळदी कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समा गणवीर, किरण अन्सारी, शीला वाशमवार, हशिना वालदे, दीक्षा तिरपुडे होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिला वाशमवार यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे उदाहरण देऊन सर्व महिलांना हिंमत न हारता पुढे जाण्यास सांगितले. किरण अन्सारी यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांनी संघटित होऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे सांगितले. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. किरण अन्सारी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. समा गणवीर यांनी आपल्या भाषणात सर्वांनी एकजूट राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, ओळख वाढवावी, तरच आपले प्रश्न सुटू शकतील, असे सांगितले.कार्यक्रमानंतर आपापल्या पतींची स्तुती (उखाणे ) म्हणण्यात आली, त्यानंतर खेळाचे आयोजन करण्यात आले. खेळानंतर हळदी कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समा गणवीर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमात सर्व महिलांनी एकत्र येऊन एकमेकांना समजून घेतले. या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला, कार्यक्रमाच्या संयोजक सौ.समा शुभम गणवीर यांनी सर्वांचे आभार मानले!
