
*पनवेलमध्ये क्रिएटिव्ह शिक्षणाची नवी क्रांती; ART FX SCHOOL OF ANIMATION चे जंगी उद्घाटन*पनवेल(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
पनवेल शहरातील उद्योजक तथा युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी श्री. अजय अरुणा अंकुश पाटील यांच्या ART FX SCHOOL OF ANIMATION या नव्या शैक्षणिक उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा शिवसेना उपनेते, राज्य संघटक व माजी आमदार श्री. बाळ माने यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.गेल्या १५ वर्षांपासून अजय पाटील यांनी आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो तरुणांना अॅनिमेशन व क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता स्वतःचा स्वतंत्र ब्रँड ART FX SCHOOL OF ANIMATION सुरू करत त्यांनी पनवेल व आसपासच्या परिसरातील नवतरुणांसाठी दर्जेदार शिक्षणाचा नवा मार्ग खुला केला आहे.या अकॅडमीमध्ये Degree in Animation, Master in Animation FX Game Design & Development, Master in FX Animation & Game Design, Master in Animation, Master in Visual Film Making, Master in FX & Compositing, Master in Architectural Visualization, तसेच 3D Motion Graphics with the Power of Gen AI असे विविध आधुनिक व उद्योगाभिमुख कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.उद्घाटनप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. बबनदादा पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख श्री. भरत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. पराग मोहिते, महानगर प्रमुख श्री. अवचित राऊत, तालुका प्रमुख श्री. संदिप तांडेल, तालुका संघटक श्री. रामदास पाटील, विधानसभा चिटणीस श्री. सुशांत सावंत, विधानसभा समन्वयक श्री. अरविंद कडव, तालुका अधिकारी श्री. मनोज कुंभारकर, विभागप्रमुख श्री. धनंजय पाटील, शहर अधिकारी श्री. निखिल भगत, विभागप्रमुख श्री. हनुमंत खंडागळे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.तसेच Ace Production च्या माध्यमातून अभिनेत्री तृप्ती राणे, अभिनेत्री अंकिता भगत, अभिनेता रितेश कांबळे, संगीतकार प्रशांत नाकटी, गायक प्रवीण कोळी, अभिनेता विशाल फाले यांचीही विशेष उपस्थिती लाभली.हा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी जनजागृती सेवा संस्थेच्या सचिव व ART FX School of Animation च्या अकॅडेमिक हेड संचिता भंडारी, 2D अॅनिमेटर सतीश पाटील, ग्राफिक ट्रेनर मिलिंद साळवे, 3D अॅनिमेटर सोहम महाडिक, गेम डिझायनर महेश दीक्षित तसेच जलदीप पाटील, मिताली घोष, मनस्वी देशमुख, सुप्रिया देढिया, दीप्ती पाटील, विधी म्हात्रे, भाग्यश्री कणसे, योगिता झगडे व सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्कार हरिओम उमासरे यांना प्रदान करण्यात आला. ग्राफिक्स, व्हिडिओ एडिटिंग व अॅनिमेशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जुन्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.ART FX SCHOOL OF ANIMATION च्या माध्यमातून पनवेलमध्ये अॅनिमेशन, VFX व डिजिटल क्रिएटिव्ह शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून, स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. येत्या काळात ही अकॅडमी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कलाकार घडवेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
