
पत्रकारितेतील दीपस्तंभ हरपला
मनोज घोसाळकर अनंतात विलीन
रोहा वार्ताहर (शैलेश गावंड) रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच साप्ताहिक रोहा टाइम्स व टीव्ही सेवन मराठी न्यूज चैनल चे संपादक जेष्ठ पत्रकार मनोज घोसाळकर यांचे वयाच्या 50 वे वर्षी दिनांक 29 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. माझे मित्र
मनोज अनंतराव घोसाळकर हे गेले वर्षभर आजारपणाशी झुंज देत होते त्यांची तब्येत चांगली झाली होती मात्र दोन दिवसापूर्वी प्रकृती अस्वस्थ त्यामुळे त्यांना मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण यावेळी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि जिल्हाभरातील सर्व पत्रकार मित्रांना ते पोरके करून गेले नुकतीच त्यांनी वयाची पन्नाशी गाठली होती.
सुरुवातीला त्यांनी दैनिक रायगड टाइम्स च्या माध्यमातून पत्रकारिता सुरू केली व अन्यायाला वाचा फोडणारे धडाडीचे पत्रकार म्हणून नावलौकिक मिळवला व स्वतःचा एक वेगळा ठसा व दबदबा निर्माण केला रोख ठोक हसरे व दिलदार व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती ग्रामीण भागातून पुढे येऊन रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवले तसेच त्यांचे जिल्हा भरातील सर्वच पक्षातील नेत्यांची जवळचे संबंध होते सुरुवातीच्या काळात ते काही काळ राजकारणात सक्रिय होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्यानेच आली त्यावेळी त्यांनी रोहा तालुक्यात एका आठवड्यात मनसेच्या तेरा शाखा स्थापन करून रेकॉर्ड केला होता मात्र पुढे पत्रकारिता व समाजकारण यामध्ये नावलौकिक मिळवला आणि साप्ताहिक रोहा टाइम्स व टीव्ही सेवन मराठी न्यूज चॅनल सुरू केले टीव्ही सेवन मराठी न्यूज चॅनल हा यू ट्यूब चॅनल चा नव्या जमान्याचा नवीन प्रकार त्यांनी सर्वप्रथम रोहा तालुक्यात सुरू केला आणि सर्वांसाठी एक नवी सुरुवात करून दिली त्यांच्या कार्याची दखल घेऊन काही संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहीण भाची असा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी 7 फेब्रुवारी तर उत्तर कार्य 10 फेब्रुवारी रोजी घोसाळे येथे होणार आहे
