
रोह्यात गणपती आरास स्पर्धेत वखारदार परिवाराच्या वाराणसी घाट देखाव्याचा प्रथम क्रमांक
रोहा प्रतिनिधी….महेश मोहिते .
खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा शहर यांच्या वतीने पर्यावरण पूरक गणपती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भुवनेश्वर येथील वखरदार परिवार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून नगराध्यक्षा वनश्री शेडगे व सहकार्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन परीवाराला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित केले. सलग चार वर्षे प्रथम क्रमांक येत असल्याने वखरदार परिवाराचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
भुवनेश्वर येथे राहणारे कृष्णा महादेव वाखरदार यांच्या निवासस्थानी सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. संजय वखारदार, संदिप वखारदार कुटुंबीयांनी, यांच्या मुलांनी दर वर्षी प्रमाणे सुंदर मनमोहक, काशी मधील वाराणसी घाट हे प्रेरणादायी धार्मिक संदेश निर्माण करणारी आरस सजावट केली होती. एक महिन्याच्या अथक प्रयत्नाने अत्यंत प्रभावशाली घरामधील कमित कमी जागेत कल्पकतेने सजावट केली. गेल्या वर्षी पुरातन काळातील मंदिर चलचित्र देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.सन 2023/24 मध्ये शिर्डी मधील द्वारकामाई तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुलस्वामिनी आई तुळजा भवानी माता, महालक्ष्मी, आई एकवीरा देवीचे मनमोहक रूप साकारले होते. यावर्षी काशी मधील प्रसिद्ध वाराणसी घाट दाखवण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला असून सलग चार वर्षे प्रथम क्रमांकाचे बक्षीस वखारदार परिवाराने मिळवले आहे. गणपती उत्सवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजकांनी, स्पर्धेच्या नियमानुसार परीक्षण करून वखारदार परिवाराच्या गणेशोत्सवातील वाराणसी घाट देखाव्याला प्रथम क्रमांक
देण्यात आले. वखारदार यांच्या निवासस्थानी जाऊन नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी पारितोषिक देऊन परीवाराला सन्मानित केले. यावेळी नगरसेवक अजित मोरे, स्वप्निल धनावडे, प्रेषित बारटक्के, नितीन कोलटकर व मान्यवर उपस्थित होते.
