
गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा स्तुत्य उपक्रम! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; अमित घाग यांच्या पुढाकाराचे केले कौतुक
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते
गणेशोत्सवासाठी मुंबईहून
आपल्या गावाकडे येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी भाजपा रोहा तालुक्याच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या मोफत मिनीडोअर बससेवेचे कौतुक होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते अलिबाग येथे गुरुवार दि. (१०) रोजी करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, जनतेच्या सेवेसाठी राबविण्यात येणारा हा अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार काढले. विशेषतः भाजपा रोहा तालुकाध्यक्ष अमित हरिभाऊ घाग यांनी पुढाकार घेऊन गणेशभक्तांसाठी सलग दुसऱ्या वर्षी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या सेवाभावी भूमिकेचे कौतुक करण्यात आले. तर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाकडे येतात. रेल्वेने रोहा येथे आल्यानंतर पुढील प्रवासाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अमित घाग यांच्या पुढाकारातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाळी, तांबडी, घोसाळे, विरझोली व भालगाव ग्रामपंचायत परिसरातील मुंबईकर गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, भाजपाचे नेते सतीश धारपा, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा चिटणीस श्रद्धा घाग, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक रोशन चाफेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. ११, १२ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशभक्तांसाठी ही मोफत बससेवा उपलब्ध राहणार असून, रोहा प्राईड बायपास रोडजवळ बसचा थांबा ठेवण्यात आला आहे. रेल्वेने रोहा येथे येणाऱ्या भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे या नोंदणीसाठी अमित घाग – ९२२६५५५५५९ व सचिन मोरे – ९२७००३५३७८ यांच्याशी संपर्क साधावा. जनतेच्या अडचणीच्या वेळी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष सेवेत उतरून मदतीचा हात देणारा हा उपक्रम रोहा तालुक्यातील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, अमित घाग यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
