
श्री प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान एकलव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा.
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रायगड जिल्ह्यातील तरुण व तरुणींसाठी ३० ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळावा श्री प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व एकलव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे३० ऑगस्ट २०२६ रोजी किल्ला येथील कालिदास मंगल कार्यालयात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात महाराष्ट्रातील ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इयत्ता आठवी उत्तीर्ण ते पदवीधर वयोमर्यादा ३५ वर्षाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
