


पंचायत समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
रोहा..(महेश मोहिते )
रोहा पंचायत समिती येथे विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक मा.अनिकेत तटकरे विधान परिषदेचे आमदार यांनी घेण्यात आली. यावेळी प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावून ती सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.पंचायत समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना*
शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करावे. तसेच नागरिकांच्या तक्रारी व समस्यांची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. मूलभूत सुविधांपासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले.
प्रशासनासमोरील अडचणींचा शासनस्तरावर पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या प्रश्नांबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत विकासकामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. विजया पाशिलकर, उपसभापती संजय माडलुसकर, जिल्हा परिषद निधी जाधव ,पंचायत समिती सदस्य गट नेते किसान मोरे, जगन्नाथ धनावडे, हंबीर मॅडम,तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, माजी उप सभापती रामभाऊ सकपाळ ,पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच,नागरिक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
