
रोह्यात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रोहा शहरात देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन उत्साही व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रांत अधिकारी,तहसीलदार, पंचायत समिती, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, उपविभागीय वन अधिकारी आदी प्रमुख शासकीय कार्यालया सह सर्व शाळा व सार्वजनिक संस्था येथे राष्ट्रध्वज फडकावून त्याला मानवंदना देण्यात आली. देशाच्या संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, जवान यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
रोहा तहसील कार्यलयात उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, पंचायत समिती येथे सभापती विजया पाशीलकर, नगरपरिषद येथे नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपविभागीय वन अधिकारी कार्यालयात शैलेंद्र जाधव, पोलीस स्टेशन येथे निरीक्षक अभय शेलार, हनुमान टेकडी येथे उपनगराध्यक्ष अहमद दर्जी या मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थित रहात सर्व अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, सदस्य, नागरिक, विद्यार्थी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे,लालता कुशवहा, समीर सकपाळ, सभापती राजेंद्र जैन, नीता हजारे, मयुर दिवेकर, महेश कोलटकर, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, अरबाज मनेर, रोशन चाफेकर,नगरसेविका पूर्वा मोहिते, संजना शिंदे, अल्मास मुमेरे, समाधान शिंदे, प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे, आदी मान्यवर उपस्थित होते
