
रोह्यात रियल एचपी गॅस एजन्सीचा मनमानी कारभार .
रोहा प्रतिनिधी..(महेश मोहिते )
रोहा तालुक्यात दोन गॅस एजन्सी गॅस वितरणाचे काम पाहतात त्यात रियल एचपी गॅस एजन्सी प्रामुख्याने मोठी गॅस वितरण करणारी एजन्सी आहे काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अचानक सरकारने नियमावली बदलली व ग्राहकांना गॅस सिलेंडर साठी खूप धावाधाव करावयास लागली ओटीपी आल्यानंतर बिल जनरेट होईल आणि त्यानंतरच आपणास सिलेंडर मिळेल अशी नियमावली गॅस एजन्सी ने काढली त्यातच संग्रामात असलेले ग्रामीण जनतेला काय करावे व काय करू नये हे समजत नसल्याने आजही रियल एचपी गॅस एजन्सी मध्ये काही अशिक्षित ग्रामीण ग्राहकांची वर्दळ असते रियल एचपी गॅस एजन्सी ची स्वतः मालकीण व कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण होत असल्याने मालक वर्ग व कर्मचारी हे ग्राहक कधीही एजन्सी मध्ये गेल्यास उडवा उडवीची उत्तरे व उर्मड भाषा वापरून ग्राहकांना नाहक त्रास देत आहेत जनता म्हणजे राजा शासकीय कर्मचारी म्हणजे जनतेचे नोकर पण आज उलट पाहायला मिळत आहे जनता कर्मचाऱ्याला साहेब सर म्हणून संबोध तो तो कर्मचारी हा त्याचा फायदा घेऊन जनतेला पायदळी तुडवताना पाहायला मिळतो.ऑफिस मधून ग्राहकांना फोनवरून तुमचा ओटीपी द्या असे सांगण्यात येते ऑफिस मधून फोन आलेला कळल्यावर अशिक्षित जनता ओटीपी देऊन टाकते स्वतःचा सिलेंडर घेण्यास गेल्यावर आपण आपला सिलेंडर घेऊन गेलात अशी माहिती ऑफिस मधून देण्यात येते गॅस एजन्सी त्या सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे धाडस करत आहे ग्राहकांनी काही विचारपूस केल्यास पोलिसांची धमकी देण्यात येते जा काय करायचे ते करा तहसीलदारांना आमच्यावर कारवाई करायला सांगा आम्ही काय कुणाला घाबरत नाही असे स्वतः मालक व कर्मचारी यांचे उत्तर असते पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने जंगलतोड होऊ नये म्हणून (ऊज्वला ) ही अतिशय महत्त्वाची योजना राबविण्यात आली जेणेकरून गोरगरीब जनतेच्या घरी सिलेंडर गॅस येईल व जंगल तोड होणार नाही पर्यावरण सुरक्षित राहील. रोहा तालुक्यातील जनता या रियल एचपी गॅस एजन्सी ला अक्षरशः कंटाळली आहे तहसीलदार ऑफिसमध्ये पुरवठा शाखेत रोजच या एजन्सीच्या तक्रारी असतात संबंधित खाते तहसीलदार साहेब ही एजन्सी दुसऱ्या कोणास सुपूर्त करावी व रोजच्या हाणामारी रोहा तालुक्यातील जनतेला त्रास मुक्त करावे हि रोहा तालुक्यातील जनतेची मागणी आहे
