
स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळ, मालसई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जून २०२६ रोजी मालसई येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
रोहा:प्रतिनिधी
या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने ३२ करंजाची, ३ वडाची आणि ५ सुपारीची अशी एकूण ४० झाडांची लागवड करण्यात आली. औषधी गुणधर्म, भरपूर ऑक्सिजन, सावली आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त अशा वृक्षांची निवड करून त्यांचे रोपण करण्यात आले.या उपक्रमासाठी कृषी अधिकारी श्री. महेश गोविलकर यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले.तसेच भैरवीनाथ क्रीडा मंडळ, मालसईच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मंडळाच्या सदस्यांमध्ये शुभम मोहिते, प्रतीक मालुसरे,रोशन चालके, श्रवण मोहिते, धनराज चालके, कुमार धनावडे, करण मराठे, आदित्य मालुसरे, अर्णव, यश, ऋषभ आणि दत्ता यांचा समावेश होता.स्फूर्ती प्रतिष्ठान, रोहाच्या वतीने सुमारे ३० ते ३५ स्वयंसेवकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांच्या सहकार्यामुळे हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.या उपक्रमासाठी सहकार्य करणारे कृषी अधिकारी श्री. महेश गोविलकर, भैरवीनाथ क्रीडा मंडळ, मालसईचे सर्व सदस्य, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ यांचे स्फूर्ती प्रतिष्ठान, रोहाच्या वतीने मनःपूर्वक आभार.श्री. सुमित रिसबूड अध्यक्ष, स्फूर्ती प्रतिष्ठान, रोहा
