संपादकीय | दीप दर्पण
सत्याचा प्रकाश… अन्यायावर थेट प्रहार!
लेखिका: संपादिका दिपीका चिपळूणकर
आज महाराष्ट्र एका विचित्र वळणावर उभा आहे. एका बाजूला विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सामान्य माणूस अजूनही अन्याय, भ्रष्टाचार आणि दुर्लक्ष सहन करत आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला — प्रत्येक घटक आपल्या हक्कासाठी झगडतोय, पण त्याचा आवाज अनेकदा दाबला जातो.
याच वेळी “दीप दर्पण” हे माध्यम एक नवं शिवधनुष्य उचलत आहे. हे केवळ बातम्या देणारं व्यासपीठ नाही, तर अन्यायाविरोधात उभं राहणारं एक आक्रमक आणि निडर शस्त्र आहे.
आजपर्यंत व्यावसायिक आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात आम्हाला महाराष्ट्रातील जनतेने दिलेला पाठिंबा आमची ताकद आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेषतः रोहेकरांनी आजवर दिलेला पाठिंबा हा आमच्यासाठी केवळ आधार नाही, तर जबाबदारी आहे. समाजात आज माझं नाव आदराने घेतलं जातं, ही माझी कमाई नसून — मायबाप जनतेचा माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे. त्या प्रत्येक विश्वासू हाताला, प्रत्येक साथ देणाऱ्या व्यक्तीला मनापासून नम्र अभिवादन.त्या विश्वासावरच आम्ही ठामपणे सांगतो — दीप दर्पण गोरगरीब, वंचित, शोषित आणि बहुजनांचा आवाज बनेल.
आमची भूमिका स्पष्ट आहे —
जिथे अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहू.
जिथे भ्रष्टाचार दिसेल, तिथे आम्ही प्रहार करू.
जिथे सामान्य नागरिकाचा आवाज दाबला जाईल, तिथे आम्ही तो अधिक बुलंद करू.
सत्ता कितीही मोठी असो, पद कितीही उंच असो — सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, तर “दीप दर्पण” त्याचा पर्दाफाश करणारच. कारण पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे.
आजच्या काळात लोकांना केवळ बातम्या नकोत, तर न्याय हवा आहे, सत्य हवं आहे आणि त्यांच्या प्रश्नांना आवाज देणारा एक मजबूत मंच हवा आहे. तो मंच बनण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
आता काळ बदलतोय… जग वेगाने डिजिटल होतं आहे.
म्हणूनच “दीप दर्पण” एक नवीन पाऊल टाकत आहे — YouTube चॅनेलच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचं!
ही फक्त सुरुवात आहे…
एक नवीन लढाई, एक नवीन मंच, एक नवीन आवाज!
हा प्रवास संघर्षाचा असेल, पण आम्ही मागे हटणार नाही.
कारण आमच्या लेखणीची ताकद ही जनतेच्या विश्वासातून येते.
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आमचं आवाहन —
अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, दीप
दर्पण सोबत उभे रहा!
कार्यकारी संपादक
समीर बामुगडे जेष्ठ पत्रकार
शब्दकन,
