
रोहा चे आराध्य श्री धावीर मंदिरात गुढीपाडवा साजरा
रोहा (शैलेश गावंड)
रोहा नगरी चे आराध्य दैवत श्री धावीर महाराज मंदिरामध्ये हिंदू नववर्ष गुढीपाडवा हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा झाला गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी हिंदू नववर्ष शके १९४८ चे स्वागत करण्यासाठी पहाटे सहा वाजता पनवेल येथील सुप्रसिद्ध शारदा संगीत भजन मंडळाचे भजन आयोजित केले होते यावेळी गायक दिलीप म्हात्रे सौ रेश्मा घाटे यांना संगीत साथ देण्या साठी हार्मोनियम वादक श्रीधर काकडे की बोर्ड हनुमान पाटील पखवाज जयदास ठाकूर तबला कु .शुभम संकपाळ टाळ कु .सर्वेश म्हात्रे हे सहभागी झाले होते तर निवेदन जे.डी. ठाकूर यांनी केले त्यानंतर आरती झाल्यावर राम रक्षा स्तोत्राचे पारायण करून विधिवत गुढी उभारण्यात आली व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला यावेळी रोहेकर नागरिक, धावीर भक्तगण व महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित राहिले होते कार्यक्रमाचे आयोजन श्री धावीर देवस्थान ट्रस्ट व श्री धावीर देवस्थान नवरात्र उत्सव कमिटीने यशस्वीरित्या केले
