



पिसाळलेल्या कुत्र्याने सहजनांचा घेतला चावा: पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी
रोहा …महेश मोहिते (प्रतिनिधी)
पिंगळसई येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांनावर हल्ला करून चावा घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत रोहा शहरासह ग्रामीण भागात पसरली आहे.नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेअसून प्रशासनाने भटक्याकुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 6 वर्षात तब्बल 30 लाख नागरिकांवर भटक्या कुत्र्यांची हल्ला करून त्यांना जखमी केली आहे, यामध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश आहे.
. रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांनवर हल्ला करून चावा घेतला आहे, काही जणांच्या पायाला ,मांडिला चावल्याने ते जखमी झाल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. उनाड भटके, पिसाळलेले कुत्रे रस्त्यांवर फिरत आहेत, पिसाळलेल्या कुत्र्याने एक लहान मुलासह वयोवृद्ध व्यक्तीवर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला , भटके पिसाळलेले कुत्रे रस्त्यावर जाताना नागरिकांच्या अंगावर धावून येत आहेत. नागरिकांना त्रासदायक होणाऱ्या पिसाळलेल्या भटक्याकुत्र्यांचा
तालुका प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
