



रोह्यातील वरसे येथील ग्राऊंडवर सोन्या चे चार हंडे सापडले! रोहतालुक्यात एकच चर्चा…
रोहा:समीर बामेगडे
अफवांवर विश्वास ठेवू नका! रोहा पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांचे नागरिकांना आवाहन
रोहा पोलिसांच्या दक्षतेमुळे तब्ब्ल 10 तोळे सोन मालकांना स्वाधीन,पहा नक्की घडलंय काय?
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून रोह्यातील वरसे या ठिकाणी चार सोन्याच्या पेट्या मिळ्याल्या आहेत अशी चर्चा चांगलीच रंगली होती यावर रोहा पोलिस निरक्षक श्री मारुती पाटील यांनी स्पष्टीकरण देत, सदर बाब खोटी असून संपूर्ण घटनाक्रम समजून सांगितला, घडलंय असं वरसेत राहणाऱ्या एका इसमाने आपली आईचे निधन झाल्यानंतर तिचे न वापण्यात येणारे सामान संबंधित ग्राउंड च्या गटारा लगत टाकून दिले होते, परिसरातील मुले खेळत असतांना त्यांना संशयास्पद गाठोडे दिसून आले. याची माहिती रोहा पोलिस स्टेशन ला समजताच रोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक श्री मारुती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला, तपासा दरम्यान एका पिशवीत त्यांना दहा तोळे सोने आढळून आले. विचारपूस केली असता संबंधित सामान हे तेथील रहिवासी अनंत दगडू पवार यांचे असल्याचे समजले त्यानंतर त्याची पूर्णतः पडताळणी करून संबंधित सोने नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, या प्रसंगी संबंधिताने रायगड तसेच विशेष रोहा पोलिसांचे आभार मानले.
