



बौद्धिक दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी पालकांची जागृती
(विशेष वृत्त शैलेश गावंड)
पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व चिंचवड मधील संभाजी नगर येथील साई संस्कार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा दिव्यांग सक्षीमीकरण कार्यालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय न्यासाच्या बौद्धिक दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या जनजागृतीसाठी साई संस्कार संस्थेच्या संस्थापक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर मंगला ताई कदम व विद्यामन नगरसेवक कुशाग्रदादा कदम यांच्या मागर्दशनाखाली पालकांची जागृती कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय न्यास कायद्याअंतर्गत समाविष्ट सेरेब्रल पाल्सी, ऑटीझम, बौद्धिक अक्षम व बहुविकलांग या चार प्रकारातील दिव्यांगांसाठी असलेल्या कायदेशीर पालकत्व, निरामया आरोग्य विमा, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारस दिव्यांग पाल्यासाठी कुटुंब निवृत्ती वेतन तसेच केंद्र व राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे निमवैद्यकीय अधिकारी नितीन कुलकर्णी, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, अभिराज फाउंडेशनचे संचालक रमेश मुसुडगे, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समुपदेशक हरिदास शिंदे,राष्ट्रीय न्यास जिल्हा स्तर समिती सदस्या भाग्यश्री मोरे,साई संस्कार संस्थेच्या व्यवस्थापक रेखा पवार,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव पालक गुरुजी,
बाबुराव अहिरे, गणेश थोरात
यांचेसह बौद्धिक दिव्यांगांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाग्यश्री मोरे यांनी केले.रेखा पवार यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. महादेव पालक गुरुजींनी उपस्थितांचे औरोपचारिक आभार मानले.
