
संविधान जीवन मूल्यांचा मार्गदर्शक ग्रंथ : रेश्मा धुमाळ * मजगांव शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा मजगांव,ता.३०(बाबुराव गोळे)भारतीय संविधान हे कायद्याचे संकलन नसून ते प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जीवन मूल्यांचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. भारतीय संविधानातील मूल्य व्यक्तीला स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधूता यांची शिकवण देतात.त्यातून व्यक्ती माणूसपण शिकून जीवन जगायला शिकतो.असे प्रतिपादन आदर्श शाळा मजगावमध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा धुमाळ यांनी केले.ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका धुमाळ यांनी संविधान निर्मितीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगीतली. संविधानाचे महत्त्व विशद करताना स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय या मुलांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे नमूद केले. तसेच युवकांनी देशाच्या विकासासाठी शिक्षण,शिस्त आणि देशनिष्ठा जपावी.असे आवाहन करण्यात आले. भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात,देशभक्ती पूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर लेझीम व सामुहिक कवायत,भाषणे,व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संविधान उद्देशिकेचे व निपूण प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शासकीय अधिकारी, कर्मचारी ,प्रतिष्ठित ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष,सर्व सदस्य,आजी-माजी विद्यार्थी,पालक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब फुंदे,चेतन चव्हाण,हर्षा नांदगावकर,संतोष दहातोंडे, स्वप्नाली बाजी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चेतन चव्हाण तर बाळासाहेब फुंदे यांनी आभार मानले.
