
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती रायगड कार्यकारिणी सभा संपन्न.
नामवंत प्राथमिक शिक्षक पतपेढी रोहा चेअरमन पदी श्री नारायण रामचंद्र गायकर यांची निवड
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
गुरुवार दि 29/10/2026रोजी पी एम श्री कोलाड ता रोहा येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती रायगड ची कार्यकारिणी सभा फार मोठ्या उत्साहात संपन्न झाली या वेळी प्रथम रोहा तालुका महिला अध्यक्षा सौ साधना साटम मॅडम उपस्थित संघटनेचे कार्यतत्पर राज्याध्यक्ष सन्मान श्री प्रसादजी म्हात्रे सर ,जिल्हाध्यक्ष मा श्री अजय कापसे सर,महिला जिल्हाध्यक्षा सौ अमिता बामणे मॅडम,जिल्हा शिक्षण समिती सदस्य ,समन्वयक श्री संतोष यादव सर ,कार्याध्यक्ष मा श्री भालचंद्र पाटील सर,सरचिटणीस मा श्री सुरेंद्र मनवे सर,कार्यालयीन चिटणीस श्री किशोर जाधव सर,शिक्षक नेत्या मा सौ तन्वी गुरव मॅडम ,मा सौ अश्विनी पार्टे मॅडम,रोहा तालुकाध्यक्ष मा श्री नारायण गायकर सर ,पनवेल तालुकाध्यक्ष मा श्री आनंद पाटील सर,महाड तालुकाध्यक्ष मा श्री सुशील जाधव सर ,पेण तालुकाध्यक्ष मा श्री म्हात्रे सर ,केंद्रप्रमुख म मा श्री नंदकुमार तेलंगे सर ,उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक स्वागत केले रोहा तालुक्यातील नामवंत प्राथमिक शिक्षक पतपेढी रोहा चेअरमन पदी श्री नारायण रामचंद्र गायकर यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती रायगड च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
