



तनया गावंड हिला पिस्तूल शूटिंग मध्ये सुवर्णपदक
रोहा (शैलेश गावंड)
ठाणे येथील VPM’s बी एन बांदोडकर
कॉलेज ची एफ वाय बी एस सी ची
विद्यार्थिनी कु तनया संदेश गावंड हिने नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय पिस्तूल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आणि मुंबई विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या अंतर्विभागीय स्पर्धेसाठी ठाणे विभागातून तिची निवड झाली आहे या बद्दल कॉलेज चे प्राचार्य सर्व प्राध्यापक यांनी तिचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून तनया चे कौतुक होत आहे
या आधी सुद्धा तिने गोवा येथे झालेल्या वेस्ट झोन शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय स्पर्धे साठी पात्र ठरली होती
तसेच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप पिस्तूल शूटिंग स्पर्धे मध्ये उत्तम कामगिरी केली होती
अथक परिश्रम घेऊन अनेक स्पर्धे मध्ये ती चांगली कामगिरी करीत असते या बद्दल सर्व स्तरातून तनया चे अभिनंदन होत आहे
