
पिंगळसई ग्रामस्थांच्या पाण्याच्या पंपाच्या वीज बिलाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी
निधी.
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
पिंगळसई ग्रामस्थांच्या पाण्याच्या पंपाच्या वीज बिलाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी
सोलर लाईट प्रकल्पाकरिता ५ लाखांचा निधी श्री अनंत देशमुख व श्री संकेत देशमुख
आपल्या अथक प्रयत्नातून आणि गावाच्या विकासाची तळमळ मनात ठेवून हा निधी महाराष्ट्र राज्य बाल विकास मंत्री कु .आदिती तटकरे यांच्या हस्ते निधीचे प्रमाणपत्र वरसे ग्रामपंचायत येथील कार्यक्रमात देण्यात आला. या निधीमुळे पाण्याच्या पंपासाठी लागणाऱ्या वीज बिलाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
निधीचे प्रमाणपत्र स्वीकारताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
गावासाठी झटणाऱ्या श्री अनंत देशमुख व श्री संकेत देशमुख कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना
पिंगळसईच्या विकासासाठी आपली ही धडपड अशीच सुरू राहो अशी सदिच्छा!
पिंगळसई ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली यावेळी पंचायत समिती सभापती सौ.विजयाताई पाशिलकर . उपसभापती श्री संजय मांडलुसकर पंचायत समिती सदस्य व पिंगळसई ग्रामस्थ उपस्थित होते.
